Teleconsulting
मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या ई-संजीवनी या टेलिकन्सल्टिंग सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेऊन आता त्याचा विस्तार करण्याची तयारी सुरू आहे. आता ते राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि असलेल्या डॉक्टरांकडून उपचार घेता रुग्णालयांशी जोडण्याचा विचार सुरू आहे. याद्वारे वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना घरी बसूनही आपल्याला हव्या येणार आहेत.
‘ई-संजीवनी’ सेवा
रुग्णांना त्यांच्या घरी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने २०१९ मध्ये ‘ई-संजीवनी’ सेवा सुरू केली. कोविड काळात खासगी रुग्णालये, डॉक्टर यांचे दवाखाने बंद होते, त्यावेळी ग्रामीण व शहरी भागातील लोकांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरली होती. ई-संजीवनी ओपीडी महाराष्ट्रात एप्रिल २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी राज्यातील काही मर्यादित जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली होती, त्यानंतर हळूहळू तिचा विस्तार करण्यात आला.
कोठे मिळणार सुविधा
ई-संजीवनी योजनेशी संबंधित एका केंद्रीय स्तरावरील अधिकाऱ्याने अलीकडेच मुंबई येथे झालेल्या ग्लोबल डिजिटल हेल्थ समिटमध्ये ‘ई-संजीवनी’ या विषयावर सादरीकरण केले आणि ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी कशी प्रभावी ठरली आहे, हे सांगितले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये विस्तारित करण्याची तयारी सुरू आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळताच वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे.
टेलिमेडिसीनची सुविधा
टेलिमेडिसीनची सुविधा रुग्णांनादेखील मिळणार टेलिमेडिसीनची सुविधा सध्या फक्त डॉक्टरांपुरतीच मर्यादित आहे. मात्र येत्या काही दिवसांत ती रुग्णांसाठीदेखील उपलब्ध होणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध आहे, मात्र ही सुविधा केवळ डॉक्टरांपुरतीच मर्यादित आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णाच्या उपचारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागल्यास ते या टेलिमेडिसीनद्वारे रुग्णाची स्थिती सांगून सल्ला घेतात. येत्या काळात रुग्णालादेखील टेलिमेडिसीनची सुविधा मिळणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
देशातील अनेक रुग्णांना लाभ
देशात नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरू झालेल्या या ई-संजीवनीचा जुलै २०२३ पर्यंत १५ कोटी ३७ लाख ३४ हजार ३८६ लोकांनी लाभ घेतला आहे. आतापर्यंत एकाच दिवसात सर्वाधिक ५ लाख १५ हजार ५३० रुग्णांचा ऑनलाइन सल्ला घेण्यात आला आहे. आतापर्यंत १,३१,७७२ आरोग्य कर्मचारी या ई-संजीवनीशी जोडले गेले आहेत.