Vastu Visharad Dr. Harshad Sharma
महाराष्ट्र तसेच देश विदेशात प्रसिद्ध असलेले विदर्भातील वाशिमच्या वास्तू विशारद डॉ. हर्षद शर्मा यांना ऍस्ट्रोलॉजी आणि वास्तू या विषयात ‘पीएचडी’ प्रदान करण्यात आली आहे. नुकताच गोवा येथे हा समारंभ पार पडला.
वास्तू विशारद डॉ. हर्षद किशोर शर्मा हे राज्यातील प्रसिद्द नाव आहे. बडे राजकीय नेते, उद्योजक सेलेब्रिटी यांच्यात ते सुपरिचित आहेत. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी अमेरिका च्या वतीने डॉ. हर्षद शर्मा यांना ऍस्ट्रोलॉजी आणि वास्तू या विषयात ‘पीएचडी’ प्रदान आली आहे. यावेळी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री डिगांबर कामत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. फॉर्च्युन कन्सल्टंसी नागपूर तसेच मित्र परिवाराच्या वतीने वास्तू विशारद डॉ. हर्षद शर्मा यांनायांचे अभिनंदन करण्यात आले